अभ्यास लक्षात कसा ठेवाल?
अभ्यास केला; पण लक्षातच राहिला नाही, अशी ओरड खूप वेळा ऐकायला मिळते. त्याचे मुख्य कारण अभ्यास करताना स्मरण-सराव या काही गोष्टींचा उपयोग आपण करत नाही. काय केल्यास अभ्यास लक्षात राहतो?
माणसाचा मेंदू हा एखाद्या कॉम्प्युटरप्रमाणे आहे. यामध्ये साठविलेल्या माहितीचा योग्य वापर आपण करायला हवा. तुमच्या जवळ असलेल्या अभ्यास विषयांची माहिती म्हणजे कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचे तर तो तुमचा डेटा आहे. हा एवढा मोठा डेटा विषयांनुरूप कसा लक्षात ठेवायचा या प्रश्नाटचं दडपण तुमच्या मनावर असेल. हे लक्षात ठेवणं आणि लक्षात ठेवलेलं योग्य वेळी स्मरण होणं यासाठी काय करायचं, हे आपण पाहणार आहोत.
*_स्मरणाचा राजमार्ग_*
स्वाध्याय या शब्दातील स्व हा शब्द महत्त्वाचा आहे. तुमच्या जवळ असलेली विषयवार माहिती म्हणजेच ज्ञान नव्हे. तुम्ही स्वतः आपल्या मनात त्या माहितीचे ज्ञानात कसे रूपांतर करता याला महत्त्व आहे. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठीच्या आकलनाची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. पण स्वाध्यायातून ते प्रयत्नपूर्वक सुधारता येते. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. ट्रायल अँड एरर किंवा प्रयत्न-प्रमाद पद्धती असे त्याला म्हणतात. स्वतःच माहितीतील तत्त्व शोधणे आणि त्यासाठी स्वतःलाच मार्गदर्शन करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वावलंबनाची भावना बळावते. आत्मविश्वाास वाढतो. विषय लक्षात ठेवणेही सोपे जाते.
*_सोप्याकडून अवघडाकडे_*
आपल्याला येत असलेल्या सोप्या गोष्टींचा अवघड गोष्टी समजण्यासाठी उपयोग करा. एखादे गणित सोडवायचे असेल, तर त्याची पद्धत समजावून घ्या. स्वतः तयारीनिशी सोडवायला सुरवात करा. स्वतः झगडा, चुकले तरी निराश न होता आपला मित्र, शिक्षक यांना न लाजता आपली अडचण विचारा. नेमकी युक्ती काय ती समजावून घ्या. गणित विषय अवघड वाटतो; पण त्याच्या युक्त्या कळल्या की तो सोपा होतो. स्वकष्टाने मिळविलेली ही युक्ती म्हणजे ज्ञान किंवा मर्म. हे मर्म समजणे अतिशय प्रेरणादायी असते.
*_सामान्याकडून सिद्धान्ताकडे_*
विज्ञान विषयांचा अभ्यास सोपा होण्यासाठी आणि लक्षात राहण्यासाठी केवळ पाठांतर किंवा पोपटपंची उपयोगाची नाही. निरीक्षण करणे, त्यावरून अनुमान काढणे, प्रयोग पद्धती समजावून घेणे आणि आपण स्वतः केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष कसे काढले हे लक्षपूर्वक आठवा. यावरून काढलेला विज्ञानाचा सिद्धान्त आठवा आणि मग तो पाठ करा. मेंदूत वैज्ञानिक ज्ञानाची रचना ही अशी मांडणी करून लक्षात ठेवायला हवी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयासाठी केलेले प्रयोग हे केवळ जर्नल भरण्यासाठी नाहीत, तर आपली तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आहेत, हे समजून घ्या कारण -
हे तत्त्व शिक्षणात आणि स्वाध्यायात म्हणजेच अभ्यासात आपले ब्रीद असावे. त्यामुळे "स्मरण' सुलभ होते. कौशल्य सारे रचनेत आहे, असे म्हणतात. मेंदूतील विषयवार डेटामधून प्रश्नाुच्या अनुरोधाने त्या त्या मुद्द्यानुसार उत्तर तयार करणे, म्हणजेच सुसंगत तर्कशुद्ध मांडणी करणे.
*_सरावात सातत्य ठेवा_*
अभ्यास या शब्दाची फोड केली तरी सरावात सातत्य किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येईल. अ = अविरत करावा लागणारा, भ= भयमुक्त करणारा, स = सहेतुक केलेला.
यामुळेच तुमच्या दैनंदिन जीवनातील वेळापत्रकाचा मुख्य अजेंडा सातत्यपूर्ण प्रयत्न हा आहे. त्यासाठी 24 पैकी 12 तास आपण सरावासाठी ठेवायला हवेत. त्यावर जानेवारी आणि परीक्षेपर्यंतचे आठवडे अत्यंत शांत चित्ताने अंमलबजावणी केलीत तर तुम्ही परीक्षेच्या दडपणातून मुक्त व्हाल आणि अभ्यास अतिशय सोपा होईल आणि तुम्हाला परीक्षेचे भय अजिबात वाटणार नाही. सहेतुक म्हणजे आपल्याला पेपर तपासणाऱ्यांकडून मार्क मिळवायचे आहेत. त्यामुळे तो हेतू डोळ्यांसमोर असेल तर उत्तराचा दर्जा निश्चि तच चांगला होईल. परीक्षकाला आपले गुण कापताच येणार नाहीत. एवढे दर्जेदार आपले उत्तर हवे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाोचे अपेक्षित असेच उत्तर तुमच्याकडून जायला हवे, म्हणजे काम फत्ते!
*_मग लागा तयारीला_*

No comments:
Post a Comment